मुंबई

ईडीच्या दोन लाचखोर अधिकाऱ्यावर मुंबईत गुन्हा दाखल, व्यावसायिकांकडून घेतली सव्वा दोन कोटीची खंडणी

मुंबई: मुंबईतील एका व्यावसायिकाला कारवाही करून अटक करण्याची भीती दाखवून सव्वा दोन कोटी रुपयांची खंडणी ईडी च्या दोन अधिकाऱ्यांनी उकळली.व्यावसायिकाने मुंबईतल्या बांगुरनगर पोलिसात तक्रार दिली.पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास गुन्हेशाखेकडे दिला आहे.

मुंबईतील ‘विंट्री टेक’ कंपनीचे मालक अमूल्य वस्सा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २० जुलै रोजी राजस्थान मधील जयपूर मधील ईडीचे सहाय्यक संचालक मोहित गर्ग आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता यांनी अमूल्य वस्सा यांच्या मालाड येथील कार्यालयात आले आणि त्यांच्यावर आरोप करत कार्यालय सील करण्याची अटकेची धमकी दिली.ही कारवाही टाळायची असेल तर ह्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला पाच कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली.व्यावसायिक अमूल्य वस्सा यांनी घाबरून तडजोड करत सव्वादोन कोटी रुपये देण्याचे मान्य केले.दुसऱ्या दिवशी हा अधिकाऱ्यांना एक कोटी रुपये दिले.

पहिला हप्ता मिळाल्यानंतर आरोपींनी २५ जुलै रोजी अमूल्य वस्सा यांच्या सहकाऱ्याला दिल्लीतील एका मॉल मध्ये बोलावल तिथे फाइल बंद केल्याचे बनावट पकागदपत्र दाखवले आणि उर्वरित सव्वा कोटी रुपये घेतले.हे अधिकारी एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी वरिष्ठ अधिकारी नाराज असून दरमहा हप्ता देण्याची मागणी केली.यावर ही अधिकारी सतत मागणी करू लागले.त्यांनी ह्या अधिकाऱ्यांनी दिलेले कागदपत्र पाहिले व आपली फसवणूक झाल्याची खात्री झाली आहे असे लक्षात आले.त्यांनी लगेच बांगुरनगर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.प्रकरण मोठे असल्याने याची चौकशी गुन्हे शाळेकडे देण्यात आली.प्राथमिक चौकशीत मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता हे ईडी म्हणजे अंमलबजावणी संचालनालयात काम करणारे अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले.पोलिस तपास करून पुढील कारवाई करत आहे.

Related Articles

Back to top button