मुंबई

मुंबईत दीड दिवसांच्या ६१ हजार ५२८ गणेशमूर्तींचे विसर्जन

मुंबई : मुंबईत दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचा विसर्जन सोहळा शांततेत आणि सुरळीतपणे पार पडला. १६ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, मुंबईत एकूण ६१ हजार ५२८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

यामध्ये ३०१ सार्वजनिक गणेशमूर्ती, तर ६१ हजार १३५ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. याशिवाय ९२ हरितालिका मूर्तींचेही विसर्जन झाले.

दीड दिवसांच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक नियोजन करण्यात आले होते. विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी विविध ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, विसर्जनाच्या काळात कोणतीही अनुचित घटना घडल्याची नोंद झाली नाही.

विसर्जनाचा तपशील :

  • एकूण गणेशमूर्ती – ६१,५२८
  • सार्वजनिक गणेशमूर्ती – ३०१
  • घरगुती गणेशमूर्ती – ६१,१३५
  • हरितालिका मूर्ती – ९२

Related Articles

Back to top button