मुंबई

बोध कीर्तनाचा, संजय राऊतंच नवं पुस्तक येणार.

मुंबई: ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच नवं पुस्तक लवकरच बाजारात येणार आहे बोध किर्तन या पुस्तकाबाबतची घोषणा संजय राऊत यांनी आपल्या एक्स माध्यमातून केली आहे केली आहे.

संजय राऊत यांनी बोध किर्तन या पुस्तकाचे कव्हर पेज एक्स माध्यमवर पोस्ट केली आहे. सदर पुस्तकातून ते कोणते नवे खुलासे करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुस्तकाच कव्हर पेज ज्यात “बोध कीर्तन” फोटो पोस्ट केला आहे.मेहता पब्लिशिंग हाऊस तर्फे लवकरच प्रकाशित होणाऱ्या माझ्या पुस्तकाची छोटीशी झलक! एक अनोखे पुस्तक असा उल्लेख पोस्ट मध्ये करण्यात आला आहे.

नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी यापूर्वी अर्थ रोड कारागृहातील आपले अनुभव कथन केले होते. पुस्तक प्रकाशनानंतर त्यावेळी राजकारणात खळबळ उडाली होती. इडी चौकशीला सामोरे जाऊन न चुकता त्यांनी तुरुंगात जाणे पसंत केले होते. त्याच कारणास्तव नरकातला स्वर्ग या पुस्तकाला शिवसैनिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. सदर पुस्तकावर आधारित वकील कपिल सिब्बल यांनी यूट्यूब साठी घेतलेली मुलाखत खूप गाजली होती. संजय राऊत दररोज आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेतून केंद्र सरकार आणि राज्य सरकारला लक्ष करीत असतात. नरकातला स्वर्ग पुस्तक चांगल्या प्रकारे गाजले होतें. बोध किर्तन महाराष्ट्राच्या राजकारणात काही खळबळ माजवणार का हे पाहणं महत्त्वाच असणार आहे.

Related Articles

Back to top button