कोकणवासीयांसाठी ४ गणपती विशेष गाड्या.

मुंबई: गणेशोत्सवात कोकणवासी मुंबईतून आपल्या गावी मोठ्या संख्येत जात असतात. बाप्पाच्या भक्तांसाठी रेल्वे प्रशासनाने ३९० ‘गणपती विशेष ‘ गाड्यांची घोषणा केली आहे.
नियमित गाड्यांव्यतिरिक्त, यामध्ये मध्य रेल्वेच्या २६२, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने दिनांक ८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान एक नवीन दैनंदिन एक्सप्रेस गाडीही सुरू केली आहे.
‘गणपती विशेष ‘ गाड्यांचाच एक भाग म्हणून, प्रवाशांची गरज लक्षात घेता मध्य रेल्वे मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या चालवणार आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (४ सेवा)
गाडी क्रमांक 01009 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दिनांक १९.०९.२०२६ आणि २६.०९.२०२६ रोजी १३.४५ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)
गाडी क्रमांक 01010 विशेष गाडी २०.०९.२०२६ आणि २७.०९.२०२६ रोजी ०४.०५ वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १८.१५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण: गाडी क्रमांक 01009 चे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रावर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) उपलब्ध आहे.”
अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह आरक्षण यूटीएस प्रणालीद्वारे केले जाऊ शकते.
तिकीट बुकिंगसाठी प्रवासी रेलवन ॲप देखील वापरू शकतात.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीइएस ॲप डाउनलोड करा.
असे प्रसिद्धी पत्रकात मुख्य जनसंपर्क अधिकारी,डॉ.स्वप्नील निला, म्हटले आहे.



