महाराष्ट्र

Shocking Statement: ‘औरंगाबाद’ ठेवा, पुण्याचं नाव बदला सुजात आंबेडकरांच्या विधानाने खळबळ

छत्रपती संभाजीनगर : शहरांच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. औरंगाबादचे नाव औरंगाबादच ठेवावे आणि पुण्याचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केली. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित ‘जय भीम Gen-Z’ मेळाव्यात ते बोलत होते.

ज्या राजाची ज्या शहरात राजधानी होती, त्या राजाच्या नावाने त्या शहराचा गौरव केला पाहिजे, अशी भूमिका सुजात आंबेडकर यांनी मांडली. पुण्याशी आपले वैयक्तिक नाते असल्याचे सांगत त्यांनी, “माझा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले आहे. पुण्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर कराव” असं सुजात आंबेडकर म्हणाले .

मात्र पुण्याचे नाव बदलण्याचा निर्णय तेथील नागरिकांना मान्य होईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विशेषतः पुण्यातील ब्राह्मण समाजाला ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव स्वीकार्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.

‘लग्नाच्या रांगेत माझा नंबर तिसरा’

मेळाव्यात युवकांनी सुजात आंबेडकर यांना विविध प्रश्न विचारले. यावेळी ‘लग्न कधी करणार?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिले.

“माझा नंबर तिसरा आहे. पहिला नंबर नरेंद्र मोदींचा, दुसरा राहुल गांधींचा आणि त्यानंतर माझा नंबर,” दोघांचे झाले की मी ठरवतो,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

Gen-Z च्या प्रश्नांवरून राजकीय पक्षांवर टीका

आजच्या Gen-Z पिढीसमोर शिक्षण, रोजगार आणि भविष्यासह अनेक प्रश्न आहेत. मात्र या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्यास भाजप, काँग्रेसपासून नव्याने आलेल्या CJPपर्यंत कोणत्याही पक्षाला रस नसल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.

युवकांच्या अडचणी समजून घेण्याची आणि त्यावर भूमिका मांडण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडी मात्र Gen-Z च्या प्रश्नांना समजून घेत असल्याचा दावा त्यांनी केला.

Related Articles

Back to top button