पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे आगामी २३ ते २५ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार
पंढरपूर : वारकऱ्यांचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल रुख्मिणी मंदिर लेपन प्रकियेसाठी तीन दिवस बंद राहणार आहे.आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शन वारकऱ्यांना घेता येणार नाही.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणाची झीज झालेली झीज लेपन प्रकिया (संवर्धन) करून ती झिज भरून काढण्यात येणार आहे. हे काम भारतीय पुरातत्त्व खात्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. २३ ते २५ सप्टेंबर असे तीन दिवस पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माहिती दिली.
पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह औसेकर महाराजांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची सभा पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, राज्य पुरातत्त्व विभाग तसेच मूर्ती संवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली तसेच मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर सर्किट बेंच यांच्या आदेशानुसार मंदिर समितीने घेतलेल्या बैठकीत दि. २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
संवर्धनासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया सुरक्षितपणे पूर्ण करता यावी. तसेच, मूर्तीच्या पावित्र्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करता यावे. यासाठी दि. २३ ते २५ सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी (मुखदर्शन व पदस्पर्शदर्शन) पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार आहे.
यापूर्वीही लेपन प्रकिया करताना दर्शन बंद
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तीवर पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्यामार्फत अत्यंत काळजीपूर्वक संवर्धनाचे कार्य केले जाणार आहे. यापूर्वी सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० या कालावधीत मूर्तीचे संवर्धन करण्यात आले. शेवटच्या संवर्धनास सुमारे पाच वर्षांचा कालावधी झाल्याने मूर्तींची नियमित देखभाल करण्याच्या अनुषंगाने मूर्तीला संरक्षक आवरण देण्यात येणार आहे.
दोन्ही मूर्तींच्या संवर्धनाबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून पाहणी व तांत्रिक मार्गदर्शन घेण्यात आले आहे. मूर्तींच्या प्राचीन स्वरूपाला, पावित्र्याला किंवा धार्मिक परंपरांना बाधा येणार नाही. या प्रक्रियेत श्रद्धेचा नितांत आदर राखून पारदर्शक पद्धतीने काम करण्यात येईल.अस पुरातत्व विभागाच्या वतीने सांगण्यात आप आहे.लेपन प्रकिया पूर्ण झाल्यानंतर दि. २६ सप्टेंबरपासून दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येईल.असे मंदिर समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
महत्त्वाची माहिती
कालावधी: २३ ते २५ सप्टेंबर २०२६ (तीन दिवस)
कारण: श्री विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांच्या मूर्तींचे जतन व संवर्धनासाठी ‘वज्रलेप’ (रासायनिक लेपन) प्रक्रिया.
दर्शन स्थिती: या तीन दिवसांत मुखदर्शन आणि पदस्पर्श दर्शन बंद राहील. भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे संवर्धनाचे काम भारतीय पुरातत्व विभाग (ASI) आणि मंदिर समिती करणार आहे. भाविकांनी याची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या दर्शनाचे नियोजन करावे.
पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मूर्ती संवर्धनाच्या कामामुळे आगामी २३ ते २५ सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहणार .
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपुरात १० ते २० लाख वैष्णवांची मांदियाळी असते.इतर दिवशी वारकरी संख्या लाखभर असते.महाराष्ट्रातूनच नाही देशभरातून विठ्ठल भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असतात.



