महाराष्ट्रमुंबई

Youth Protest in Maharashtra: शिवाजी पार्क, MPSC आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल.

मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या कारभाराविरोधात तरुणांमध्ये मोठा असंतोष असल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शिवाजी पार्कवरील आंदोलन, MPSCच्या मुद्द्यावर पुण्यातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि आदिवासी विद्यार्थ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्च ही त्याची उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला. कितीही गुन्हे दाखल झाले तरी तरुणाई मागे हटणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

निवडणूक आयोगाच्या कारभारावरही सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, दोन निवडणूक आयुक्त आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रांवर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली. “मूळ प्रश्नांवर उत्तर देण्याऐवजी हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तानचा मुद्दा पुढे करणे थांबवावे,” असे ते म्हणाले.

MPSC आंदोलनावरूनही सरकारवर टीका

आदिवासी विद्यार्थ्यांचा नाशिक ते मुंबई लाँग मार्चही सुरू आहे.

MPSCच्या मुद्द्यावर पुण्यात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. अध्यक्षांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांची मागणी असताना सरकारने त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सपकाळ यांनी केली.

शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची अपेक्षा

राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीवर बोलताना सपकाळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य महाराष्ट्र दौऱ्याचा उल्लेख केला. “पंतप्रधान महाराष्ट्रात येताना शेतकऱ्यांसाठी मोठे पॅकेज घेऊन येतील आणि हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करतील, अशी अपेक्षा करूया,” असे सपकाळ म्हणाले.

MVAमध्ये नाराजी नसल्याचा दावा

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नसल्याचेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. पाच जागांपैकी दोन जागांवर काँग्रेसचे विद्यमान आमदार असून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. अमरावतीत उमेदवार जाहीर केला असून अन्य दोन जागांवर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Sahil Wakode कुटुंबीयांची काँग्रेस नेत्यांशी भेट

IIT बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. साहिलच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी त्यांच्याशी चर्चा केली. साहिलला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या भेटीवेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, रेहाना चिश्ती, यू. बी. व्यंकटेश, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन आणि आशुतोष शिर्के उपस्थित होते.

Related Articles

Back to top button