महाराष्ट्रमुंबई

सीएनजीची १ रुपयाने वाढ:एप्रिलपासून आठ रुपयांनी इंधन महागले,टॅक्सी,रिक्षा ओला उबरवर खर्च वाढला

मुंबई : महानगर गॅस लिमिटेड म्हणजेच एमजीएलने १ ऑक्टोबरपासून सीएनजीच्या दरात किलोमागे एक रुपयाची वाढ केली आहे.यामुळे महामुंबई परिसरातील वाहनचालकांना सीएनजीच्या दरवाढीचा पुन्हा झटका बसला आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात असलेल्या सीएनजी पंपावरील दर आता ८९ रुपये प्रति किलो झाला आहे. यावर्षीच्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत सीएनजीच्या दरात एकूण आठ रुपये प्रति किलो इतकी वाढ झाली आहे.आयात केलेल्या रिगॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅसच्या (आरएलएनजी) किमती आंतरराष्ट्रीय गॅस निर्देशांकांशी जोडलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसच्या किमती वाढल्याने गॅस खरेदीचा खर्च वाढल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
एमजीएलने या दरवाढीसाठी गॅसच्या वाढलेल्या खरेदी खर्चाचा असा दाखला दिला आहे.
]
दरवाढीचा थेट परिणाम रिक्षा आणि टॅक्सी ओला,उबर चालकांच्या इंधन खर्चावर होणार आहे. सीएनजीच्या एक रुपयाच्या दरवाढीमुळे रिक्षाचालकांच्या खर्चात किलोमीटरमागे सुमारे ३.९ पैसे वाढ झाली आहे. आतापर्यंतच्या दरवाढीमुळे हा अतिरिक्त खर्च सुमारे १२ पैसे प्रति किलोमीटर झाला आहे. यापूर्वीचा अतिरिक्त खर्च सुमारे ६६ पैसे प्रति किलोमीटर होता, असे रिक्षा चालक बनवारीलाल दुबे यांनी सांगितले.वाढत्या इंधन खर्चामुळे रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची मागणीही त्यांनी केली आहे.
अशी झाली सीएनजी दरवाढ

तारीख
वाढ

१२ एप्रिल
₹१ प्रति किलो

१४ मे
₹२ प्रति किलो

३० मे
₹२ प्रति किलो

१ सप्टेंबर
₹२ प्रति किलो

१ ऑक्टोबर
₹१ प्रति किलो

एकूण वाढ
₹८ प्रति किलो

सध्याचा सीएनजी दर : ₹८९ प्रति किलो

Related Articles

Back to top button