मुंबई

Maharashtra MLC : वंचितचे 4 उमेदवार कोणाला नडणार

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने चार उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने या उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघांसह पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून पक्षाने उमेदवार दिले आहेत.

पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून मंगेश छत्रपती वानखेडे, तर पुणे पदवीधर मतदारसंघातून प्रा. सोमनाथ जनार्दन साळुंखे यांचा समावेश आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून डॉ. आय.सी. शेख आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातून गाजी जाहोरेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत आवाज उठवावा या उद्देशाने पक्षाने उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे .

शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, शिक्षकांच्या अडचणी, पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी तसेच शैक्षणिक व्यवस्थेतील पारदर्शकता या मुद्द्यांवर पक्षाकडून प्रचार केला जाण्याची शक्यता आहे.त्यासोबत उमेदवारांच्या विजयासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button