महाराष्ट्रमुंबई

मिठी नदीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करा; श्वेतपत्रिका काढा

मुंबई : मिठी नदीच्या कामांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांकडे लक्ष वेधले.

मिठी नदीसंदर्भातील २०१७ ते २०२१ या कालावधीत काढण्यात आलेल्या निविदांमध्ये मोठी तफावत असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. मिठी नदीचा तळाचा दगड तोडण्यासाठी निविदा काढण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात काम झाले नसल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.

तसेच कोविडच्या काळात मंजूर करण्यात आलेल्या विविध प्रस्तावांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली. या मागण्यांबाबत आयुक्त भिडे सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

मिठी नदीच्या कामांबाबत वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येणार असून, आगामी काळात शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी हा मुद्दा लावून धरतील. या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही शीतल म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button