महाराष्ट्र

एसटी बसचा टायर निखळल्याप्रकरणी सहाय्यक कारागीर निलंबित

शिरूर आगारातील बसमध्ये बिघाड; ३८ प्रवासी सुखरूप

पुणे : छत्रपती संभाजीनगर–पुणे मार्गावर धावणाऱ्या शिरूर आगाराच्या एसटी बसचा चालक बाजूचा पुढील टायर हब शाफ्ट तुटल्याने निखळून पडल्याची घटना जुने कायगाव येथे घडली. या प्रकरणी एसटी प्रशासनाने बारामती येथील एसटी कार्यशाळेतील यांत्रिक विभागातील सहाय्यक कारागिराला दोषी धरून निलंबित केले आहे.

शिरूर आगाराची MH-14-MH-7025 क्रमांकाची बस छत्रपती संभाजीनगरहून पुण्याकडे जात होती. जुने कायगाव येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास बस धावत असताना चालकाच्या बाजूचा पुढील टायर हब शाफ्ट तुटल्याने टायर फुटून निखळून पडला. त्यामुळे बस मार्गस्थ बिघाडग्रस्त झाली.

बसध्ये ३८ प्रवासी होते. या घटनेत चालक, वाहक तसेच कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. बसमधील प्रवाशांना अन्य एसटी बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. घटनेची माहिती शिरूर आगाराला देण्यात आली असून, ऑनलाइन तक्रारही नोंदविण्यात आली.

दरम्यान, वाहनाच्या देखभाल-दुरुस्तीतील त्रुटीप्रकरणी बारामती एसटी कार्यशाळेतील यांत्रिक विभागातील सहाय्यक कारागिरावर कारवाई करण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने त्याला या प्रकरणात दोषी धरून निलंबित केले आहे.

Related Articles

Back to top button