मुंबई
दीपकेंना विष्णूचा अवतार करूनही सीजेपीची साथ मिळाली नाही

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा टोला
मुंबई : अभिजित दीपकेंना विष्णूचा अवतार म्हणत उद्धव ठाकरे यांनी डोक्यावर घेतले; मात्र आजच्या ठाकरे बंधूंच्या मोर्चाकडे ‘काँक्रोज जनता पार्टी’ने पाठ फिरवली, असा टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला.
“दीपकेंना विष्णूचा अवतार करूनही उपयोग झाला नाही. कालपर्यंत सीजेपीच्या प्रत्येक आंदोलनात घरचे लग्न असल्यासारखे सहभागी होणाऱ्यांकडे आजच्या आंदोलनात पाठ फिरवण्याची वेळ आली. एकही ‘झुरळ’ या आंदोलनात फिरकले नाही,” अशी टीका बन यांनी केली.
“हिंदुत्वाचा विचार सोडून झुरळांच्या नादी लागल्यावर दुसरे काय होणार?” असा सवाल करत बन यांनी उबाठा गटाला लक्ष्य केले.



