मुंबई

मुंबईत १०व्या जेम अँड ज्वेलरी शोचे दिमाखात उद्घाटन

मुंबई : ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलतर्फे आयोजित ‘१०वा जेम अँड ज्वेलरी शो २०२६ – दिवाळी एडिशन’चे उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी GJCचे चेअरमन राजेश रोकडे, व्हाईस चेअरमन अविनाश गुप्ता, GJSचे कन्व्हेनर तथा माजी चेअरमन सैय्यम मेहरा यांच्यासह ज्वेलरी उद्योगातील मान्यवर उपस्थित होते.

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ज्वेलर्ससाठी खरेदी-विक्री, व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग तसेच नवनवीन डिझाइन्सच्या सादरीकरणासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.

या प्रदर्शनात ४०० हून अधिक प्रदर्शक आणि ७०० हून अधिक बूथ सहभागी झाले आहेत. तसेच १० हजारांहून अधिक अभ्यागत आणि दोन हजारांहून अधिक होस्टेड बायर्स सहभागी होण्याची अपेक्षा आहे. देश-विदेशातील आघाडीच्या ज्वेलरी व्यावसायिकांच्या सहभागामुळे दागिने उद्योगातील नवे डिझाइन्स, आधुनिक तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि व्यवसायाच्या विविध संधींचे दर्शन या प्रदर्शनातून घडत आहे.

‘हमारा अपना शो’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला GJS हा देशातील आघाडीच्या B2B ज्वेलरी प्रदर्शनांपैकी एक आहे. भारतीय रत्न व आभूषण उद्योगाला नव्या बाजारपेठांशी जोडण्याबरोबरच देशातील ज्वेलर्सना व्यवसाय विस्तारासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या प्रदर्शनातून केले जात आहे.

Related Articles

Back to top button