मुंबई

विमानातील प्रवाशाला माजी मंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून तातडीची वैद्यकीय मदत…

मुंबई: दिल्लीहून आइजोलकडे जाणाऱ्या IndiGo 6E 291 या विमानातील एका प्रवाशाची प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडली. प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि डॉक्टर डॉ. भागवत कराड यांनी तत्काळ पुढाकार घेत प्रवाशाला वैद्यकीय मदत केली.

विमानातील उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा वापर करून डॉ. कराड यांनी प्रवाशावर प्राथमिक उपचार केले. प्रवाशाला ऑक्सिजनची आवश्यकता असल्याने ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन देण्यात आला. विमान कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने प्रवाशाची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

आइजोल विमानतळावर विमान पोहोचताच प्रवाशाला ऑक्सिजनच्या सुविधेसह रुग्णवाहिकेतून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत डॉ. कराड यांनी डॉक्टर म्हणून दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता प्रवाशाच्या मदतीसाठी महत्त्वाची ठरली.

राजकीय आणि प्रशासकीय जबाबदारी सांभाळत असतानाही वैद्यकीय पेशाशी असलेली बांधिलकी जपत त्यांनी संकटाच्या क्षणी प्रवाशाच्या मदतीला धाव घेतली.

Related Articles

Back to top button