MLC Election: काँग्रेसने पत्ते उघडले; 3 उमेदवारांची घोषणा.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिजित वंजारी, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून जयंत दिनकर आसगावकर आणि अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मंजुरीनंतर या नावांची घोषणा करण्यात आली.
अभिजित वंजारी आणि जयंत आसगावकर हे अनुक्रमे नागपूर पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान विधान परिषद सदस्य आहेत. काँग्रेसने दोघांनाही पुन्हा संधी दिली आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती पोहरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राज्यात विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक अशा एकूण पाच मतदारसंघांसाठी निवडणूक होत आहे. मतदान २३ ऑक्टोबरला होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे तीन उमेदवार जाहीर
काँग्रेसचे उमेदवार
- नागपूर विभाग पदवीधर : अभिजित गोविंदराव वंजारी
- पुणे विभाग शिक्षक : जयंत दिनकर आसगावकर
- अमरावती विभाग शिक्षक : प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे



