मुंबई

MPSC Big Update: सचिव महेंद्र हरपळकरांची प्रतिनियुक्ती संपुष्टात…

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) सचिव महेंद्र उत्तमराव हरपळकर यांना सचिवपदावरून हटविण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने १ ऑक्टोबर २०२६ रोजी आदेश काढून त्यांची आयोगाच्या सचिवपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे.

हरपळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव त्यांची प्रतिनियुक्ती आता संपुष्टात आणण्यात आली असून, त्यांना तातडीने पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आयोगाच्या सचिवपदाचा कार्यभार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या संमतीने अन्य अधिकाऱ्याकडे सोपविण्याची कार्यवाही करण्याचेही शासनाने निर्देश दिले आहेत.

हरपळकर यांच्या पुढील पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button