मुंबई

SIR Update: WhatsAppवरील पुरावेही ग्राह्य; मतदारांना सुनावणीसाठी बोलावू नका, CEO चोक्कलिंगम यांचे आदेश

मुंबई : राज्यातील मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नोटीसा जारी होऊ लागल्याने मतदारांच्या संतप्त भावना लक्षात घेऊन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी एसआयआर नोंदणी करताना व्हॉट्सॲपवरील पुरावे ग्राह्य धरा, असे निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आदेश दिले आहेत.

चोक्कलिंगम यांनी सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन त्यांना काही सूचनाही केल्या.

निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या नोटिसांची विविध राजकीय पक्षांनीही दखल घेतली आहे. त्यामुळे संभाव्य नाराजी टाळण्यासाठी चोकलिंगम यांनी हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कोणत्याही नागरिकाला सुनावणीसाठी बोलवू नका किंवा त्यांच्या घरी जाण्याची गरज नाही. मतदारांनी व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे पाठवलेली कागदपत्र ग्राह्य धरून पुढची प्रक्रिया करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

चोकोलिंगम यांनी निवडणूक आयोगाला नुकत्याच पाठविलेल्या पत्रात कागदपत्रे वैध असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी न बोलावता सूट देण्याचा पर्याय सुचविला होता. अखेरीस या सूचनेची दखल घेत आयोगाने चोकलिंगम यांची मागणी मान्य केल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button