मुंबई
लालबागच्या राजाच्या चरणी सुनेत्रा पवार यांचे बळीराजासाठी साकडे

मुंबई : राज्यातील कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. राज्यातील शेतकरी बांधवांवरील संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.
राज्यातील बळीराजाच्या शेतात पुन्हा हिरवळ यावी, पिकांना पुरेसे पाणी मिळावे आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला चांगले फळ मिळावे, अशी भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धीचे दिवस यावेत, यासाठीही त्यांनी गणरायाकडे साकडे घातले.
राज्यात समाधानकारक पाऊस पडावा, पिकांचे नुकसान टळावे आणि शेतकरी या संकटातून सुखरूप बाहेर पडावेत, अशी प्रार्थना विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी केल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.



