मुंबई

राहुल गांधींची एक पोस्ट, राजकीय वर्तुळात खळबळ.

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर अंतरिम स्थगिती दिली आहे. आधी शिवसेना मग एनसीपी आणि आता तृणमूल काँग्रेस असं म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर निशाणा साधत तीनही घटनांमध्ये समान कार्यशैली असल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपावर ताशेरे ओढले आहे. भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन प्रत्येक वेळेस एखाद्या पक्ष फोडून पक्षाचा निवडणूक चिन्ह हिरावून घेतात. त्यामुळे संपूर्ण पक्ष चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे लाखो भारतीयांचे मतेही चोरले जाणे आश्चर्यकारक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मतांची चोरी,सरकार चोरी आणि पक्षाची चोरी हे लोकशाहीच्या पतनाचं प्रतीक बनले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जनमताचे रक्षण करणे निवडणूक आयोगाची जबाबदारी मात्र उलट जनतेचे निर्णय उलथवून लावणाऱ्या शक्तींना निवडणूक आयोग सहकार्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा लढा केवळ पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नाही तर स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका हव्या असलेल्या प्रत्येक राजकीय पक्ष आणि प्रत्येक मतदाराचा असल्याचं आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Back to top button