मुंबईराष्ट्रीय

NCMC कार्डधारकांसाठी आता BHIM Appद्वारे सहज करता येणार Top-up

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. NCMC कार्डधारकांना आता BHIM Appच्या माध्यमातून आपल्या कार्डचे Top-up करता येणार आहे. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नसून, मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.

NCMC कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या NCMC कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला अधिक गतिमान आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने दि. १५ सप्टेंबर २०२६ पासून BHIM Appद्वारे NCMC कार्ड Top-upची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधेचा वापर करण्यासाठी NCMC कार्डच्या पाठीमागील QR कोड BHIM Appच्या माध्यमातून स्कॅन करावा लागणार आहे. QR कोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार Top-up करता येईल. त्यामुळे प्रवाशांना NCMC कार्डमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम तत्काळ जमा करण्याची सुविधा मिळणार आहे.

एसटी महामंडळाच्या डिजिटल प्रवासी सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा, अधिक सुलभ आणि अधिक गतिमान प्रवास’ या उद्देशाला या सुविधेमुळे आणखी बळ मिळणार आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी NCMC कार्डचा वापर अधिक सुलभ होणार आहे.

Related Articles

Back to top button