मुंबई

नायट्राझेपा अमली पदार्थांच्या १२.८१ किलो गोळ्यांसह दोघांना अटक

मुंबई : गेल्या काही वर्षात मुंबईत अनेक युवक अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.त्यामुळे गुन्हेही वाढत आहेत आहेत.मुंबई पोलिसांचं अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच गुन्हे शाखा सतत अशा युवकांवर सतत लक्ष ठेऊन विशेष कारवाई करत असतात.गुन्हे कक्ष – ६ या पथकाने कार्यवाही अंमली पदार्थ गोळ्या जप्त कारत ६४ लाख रुपयांचा मुद्दे माळ जप्त केला.

नायट्राझेपाम या अंमली पदार्थाच्या गोळ्यांची बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-६च्या पथकाने अटक केली. आरोपींकडून नायट्राझेपामच्या तब्बल २१ हजार गोळ्या, त्यांचे एकूण वजन १२.८१ किलो असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ६४ लाख ५ हजार रुपये आहे. जप्त केला आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष-६ला ९ सप्टेंबर रोजी याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने ट्रॉम्बे वाहतूक कार्यालयाच्या मागील बाजूस, पनवेल-सायन महामार्गालगतच्या दक्षिण वाहिनी सर्व्हिस रोडवर सापळा रचला. यावेळी दोन संशयितांना नायट्राझेपामच्या गोळ्या बेकायदा विक्रीच्या उद्देशाने ताब्यात ठेवलेल्या अवस्थेत पकडण्यात आले.

पोलिसांच्या तपासात हे दोघेही नशेसाठी या गोळ्यांची ग्राहकांना विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी दोघांविरोधात एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपींमध्ये गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरातील ४४ वर्षीय पुरुष आणि मुंब्रा-कौसा येथील ५० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Related Articles

Back to top button