1980s Retro AI Trend: या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्हीही तयार करू शकता ट्रेंडी फोटो…

सोशल मीडियाचा वापर करत असाल तर तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की सध्या इन्स्टाग्राम आणि ‘एक्स’सह (X) विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर ‘1980s रेट्रो ट्रेंड’ (1980s Retro AI Trend) तुफान गाजत आहे. युजर्स आपले आजचे मॉर्डन फोटो 1980 च्या दशकातील क्लासिक, नॉस्टॅल्जिक आणि व्हिंटेज बॉलिवूड/हॉलिवूड स्टाईलमध्ये रूपांतरित करून शेअर करत आहेत. सेलिब्रिटींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनाच भुरळ घालणारा हा ट्रेंड नेमका काय आहे आणि तुम्ही तुमचा फोटो कसा तयार करू शकता, ते जाणून घेऊया.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या ट्रेंडमध्ये 80 च्या दशकातील पोलरॉइड कलर टोन, ग्रेनी टेक्सचर, पॉईंटेड कॉलर, व्हिंटेज हेअरस्टाईल आणि क्लासिक बॅकग्राउंड आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) साहाय्याने तयार केले जात आहे. AI टूल्स आणि ChatGPT च्या स्पेशल प्रॉम्प्ट्समुळे सामान्य युजर्सही अवघ्या काही सेकंदांत असे फोटो बनवत आहेत.
हा AI रेट्रो ट्रेंड कसा काम करतो?
हे AI टूल्स साध्या फोटोला ॲनालॉग कॅमेरा, 1980 चा फिल्म रोल लूक, सॉफ्ट लाईटिंग आणि रेट्रो फॅशनसह पुन्हा डिझाइन करतात. युजर्स ChatGPT (DALL-E 3), Midjourney किंवा Bing Image Creator सारख्या टूल्समध्ये योग्य प्रॉम्प्ट देऊन आपला चेहरा आणि पोझ 80 च्या दशकातील व्हिंटेज लूकमध्ये बदलत आहेत.
1980s रेट्रो फोटो तयार करण्यासाठी व्हायरल AI प्रॉम्प्ट:
रेट्रो लूक मिळवण्यासाठी युजर्स खालील कस्टमाइज्ड प्रॉम्प्टचा वापर करत आहेत:
“Create a realistic 1980s vintage portrait of a person based on this image. Style it with classic 80s retro fashion, film camera grain, soft warm tones, polaroid lighting aesthetic, voluminous retro hairstyle, and a nostalgic 1980s aesthetic background.”
रेट्रो फोटो तयार करण्याची स्टेप-बाय-स्टेप पद्धत:
ChatGPT (Plus/DALL-E), Bing Image Creator किंवा इतर कोणतेही AI इमेज जनरेटर प्लॅटफॉर्म ओपन करा.
तुमचा नेहमीचा फोटो अपलोड करा आणि सोबत 1980s चा टेक्स्ट प्रॉम्प्ट पेस्ट करा.
तुमच्या आवडीनुसार 1980 च्या दशकातील बॉलिवूड हिरो/हिरॉईन किंवा व्हिंटेज लूकसाठी कस्टमाइज्ड गोष्टी जशी की रेट्रो गॉगल, बेलबॉटम पँट, कॅसेट प्लेयर वगेरे पण एड करु शकता.
AI द्वारे जनरेट झालेली व्हिंटेज इमेज हाय-रिझोल्यूशनमध्ये सेव्ह करून सोशल मीडियावर शेअर करा.
